मुंबई, दि. १४ :- ‘मराठी वाङ्मयाच्या सेवेला वाहून घेतलेला उमदा साहित्यव्रती हरपला,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘मनोहर म्हैसाळकर यांनी साहित्यिक चळवळीला वाहून घेतले होते. लेखन, संशोधन आणि सर्जनशील साहित्य निर्मिती बरोबरच त्यांनी क्रीडा क्षेत्रात संघटनात्मक कार्य केले. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपदही यशस्वीपणे सांभाळले. त्यांच्या निधनामुळे एक उमदा, अभ्यासू साहित्यव्रती हरपला आहे. ज्येष्ठ साहित्यिक मनोहर म्हैसाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
