देशभरात कोळशाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने देश सध्या कोळसा तुटवड्याशी दोन हात करत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाहीये. पाऊस नसल्याने देशभरातील विविध ठिकाणी उकाडा वाढला आहे. उकाडा वाढल्याने साहजिकच विजेची मागणी देखील वाढली आहे. त्यातच कोळशाचा तुटवडा जाणवत असल्याने त्याचा डायरेक्त्त परिणाम वीज निर्मितीवर होत आहे. देशभरातील औष्णिक केंद्रांकडे सध्या फक्त चार दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक असल्याने लोकांना वीजपुरवठा खंडित होण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
देशभरातील औष्णिक वीज प्रकल्पांची क्षमता 9500 मेगावॅटच्या घरात आहे. या सर्व प्रकल्पांतून सध्या 6 ते 7 हजार मेगावॅट एवढ्या प्रमाणात वीजनिर्मिती होत असल्याने यासाठी दररोज तब्बल 1 लाख मेट्रिक टन कोळशाची गरज भासते. महानिर्मितीकडे सध्या साडेआठ लाख मेट्रिक टन म्हणजेच चार ते पाच दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. यातही नाशिक आणि कोरडी वीज केंद्रामध्येच मुबलक प्रमाणात कोळसा आहे. त्यामुळे कोळसा खाणीत पावसाचे पाणी शिरले किंवा तांत्रिक अडचणींमुळे रेल्वेत बिघाड होऊन कोळसा पुरवठा थांबला तर महानिर्मितीच्या वीजनिर्मिती करणे कठीण जाणार आहे. त्यातच केंद्र सरकारने विजेची वाढती मागणी लक्षात घेता सर्व राज्यांना वीजनिर्मिती वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र महानिर्मितीकडे मुबलक प्रमाणात कोळसाच नसल्याने देशभरात भारनियमन होण्याची दाट शक्यता आहे.
कोणत्याही अडचणीविना औष्णिक वीज केंद्रातून वीजनिर्मिती करता यावी यासाठी किमान सात दिवस पुरेल एवढा पाणीसाठा असणे गरजेचे आहे. कोळशाचा साठा यापेक्षा खाली आल्यास आणीबाणीची परिस्थिती असते. तर देशभरातील औष्णिक केंद्रांमध्ये हा साठा आता चार दिवस पुरेल एवढाच शिल्लक आहे. महानिर्मितीकडे चार ते पाच दिवसांचाच कोळशाचा साठा शिल्लक असल्याने परिणामी क्रिटिकल परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.
औष्णिक केंद्रांवर उपलब्ध कोळसा साठा
नाशिक- 8 दिवस पुरेल एवढा
खापरखेडा- 5 दिवस पुरेल एवढा
चंद्रपूर- 5 दिवस पुरेल एवढा
परळी- 5 दिवस पुरेल एवढा
भुसावळ- 5 दिवस पुरेल एवढा
पारस- 4 दिवस पुरेल एवढा
कोराडी- 9-10 दिवस पुरेल एवढा
कोळशाचा साठा अचानक कमी व्हायला ऊर्जा खाते आणि सरकारमधील चर्चेचा अभाव प्रामुख्याने निदर्शनास येतो. सरकार आणि ऊर्जा खात्याच्या हलगर्जीपणामुळे देशभरातील नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. या अनियमित लोडशेडिंगमुळे जनता त्रस्त झाली आहे. उकाड्याने नागरिक बेहाल झाले आहेत.