महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी ‘गोष्ट एका पैठणीची‘ चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन
मुंबई, दि.५: साध्या सरळ गोष्टीतून मनाचे सुख नेमके काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. आपले सुख, हास्य कसे मिळवता येईल हाच या सिनेमाचा गाभा असल्याने हा सिनेमा आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने मंत्रालयातील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘गोष्ट एका पैठणीची‘ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन आज संध्याकाळी आयनॉक्स सिनेमागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी या चित्रपटात मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री सायली संजीव, अभिनेता सुब्रत जोशी,दिग्दर्शक शंतनु रोडे, अभिनेता पुष्कर क्षोत्री, प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर, सुनील बोधनकर, दीपा त्रासी, आदी उपस्थित होते.