गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

भाजीपाला शेतीच्या माध्यमाने मिळाला व्यवसायचा नवा मार्ग

धानाची शेती पाऊसाच्या भरोष्यावर फक्त खरीप हंगाम्यात होत असायची पाणी आले तर पीक अन्यथा शेतीची मोठ्या प्रमाणत नुकसान व्हायची मेहनत घेऊन सुधा हातात तोटा यायच्या अश्या परिस्थितीत भाजीपाला पीक घ्यायचे निर्णय घेऊन भाजीपाला पिकाचे योग्य नियोजन करुन त्या धानाच्या शेताला त्यांनी व्यवस्थित रीतिने खते टाकून त्या शेतीला भाजीपाला पीक घेण्या योग्य बनवले.तसेच पाण्याची व्यवस्था करून घेतले.भाजीपाला शेतीचा योग्य नियोजन करून भाजीपाला शेती नफ्याची ठरविले.भाजीपाला पिकातून वर्षातून लाखो रुपयाचे उत्पादन होत आहे.
मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपुर येथील निखिल बारई हे शेतकरी असून यांनी आपल्या शेत जमीच्या 3 एकर जागेवर त्यांनी मिरची, टमाटर, वांगे, पत्ताकोबी, फुलकोबी,मेथी, सांबार, चवडीचे शेंगा, वालाचे शेंगा अशे विवध प्रकारचे भाजीपाला पीक घेतात. मुख्यतः म्हणजे या घराण्यात परंपरा चालत असून याच्या वडिलांच्या माध्यमाने सुरुवात झाली ती परंपरा त्यांचा मुलगा नरेन निखिल बारई शेतात भाजीपाला पिकवनियात मेहनत घेत असून समोर नेत आहे.
भाजीपालाला त्यांनी आठवडी बाजारात नेऊन विकत असे तचेच मुलचेरा येथे मुख्य चौकात भाजीपाल्याचे दुकान लावले असून या दुकानाच्या माध्यमाने नागरिकांना ताजे भाजीपाला पुरवत आहे.