ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गाव ग्रामसभा आलापल्ली तर्फे ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, मुलचेरा च्या वतीने जाहीर पाठिंबा

आलापल्ली:- गाव ग्रामसभा आलापल्ली तर्फे ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट यांनी पस्थित राहून संघटनेचा वतीने आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

यावेळी श्री दिपक आशालु तोगरवार यांचे सह अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र धारकांचे प्रमाणपत्र जप्त करून त्यांचे विरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करावे,ग्रामपंचायत अधिनियमाचे भंग करणारे सरपंच, उपसरपंच यांना अधिकार पदावरून काढून टाकावे,

मालगुजारी तलावात अवैद्य बांधकाम करणारे सचिव व सरपंच यांचेविरूध्द कार्यवाही करावे,

ग्रामपंचायत आलापल्ली अंतर्गत दि. १५/२/२०२१ पासुन विविध योजने अंतर्गत केलेल्या कामाची व साहित्य खरेदी

घोटाळ्याची चौकशी करावे,

 ग्रामपंचायत अंतर्गत असलेले कोंडवाडा जमिनीचे चौकशी करून दोषी सरपंच व सचिव यांचेविरूध्द कार्यवाही करावी,

पोलीस चौकी लगतचे शासकीय जागेचे व इतर शासकीय जागेचे खाजगी लोकांना घरटॅक्स पावती देवून अतिक्रमण करणाऱ्यांना सहकार्य करून अधिकाराचा गैरवापर करणारे संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त करावी,

नागरी पाणी पुरवठा योजनेत कंत्राटदार यांनी काम पूर्ण केल्यानंतर ६ (सहा) महिनेपर्यंत गुणवत्ता व दर्जा न तपासता ग्राम पंचायत गुणवत्ता व दर्जाहिन कामाचे पूर्णत्वाचा ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्याची चौकशी करावी,

नागरी पाणी पुरवठा योजनेत लाभार्थीकडून नळ जोळणीचे ३० फुट पाईप न देता लाभार्थ्यांची फसवणुक केली व लाभार्थ्यांकडून त्याचे पैसे घेतले त्याची चौकशी करावी,ग्राम कोष रक्कमेचे गैरव्यवहार प्रकरणी जुने गुन्हे दाखल केलेले आहे याची सखोल चौकशी करून गुन्हेगाराकडून रक्कम वसुल करावे,

स्वच्छ भारत योजने अंतर्गत स्वच्छतागृह बांधकामात ज्यांनी स्वच्छतागृह बांधकाम केलेले नाही त्यांना अनुदान वाटप करण्यात आले. ज्यांनी स्वच्छतागृह बांधकाम केले त्यांना परिपूर्ण अनुदान वाटप करण्यात आलेले नाही. सदर गैरव्यवहाराची चौकशी करावी.

या मागण्यांसह अन्य मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाला विस्तार अधिकारी आणि तहसीलदार यांनी भेट दिली व येत्या सात दिवसांत जिल्हास्तरावर कमिटी नेमुन तुमचे मागण्या पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले.

यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट,माजी सभापती भास्कर तलांडे,किशोर सडमेक, डौलत उरेत, नामदेव आत्राम, बगवान सिडाम (झिमेला),गणपत तावाडे, सतिश कोरेत, संतोष तोडसाम, दिलिप आत्राम, रमेश मडावी यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.