प्रजासत्ताक दिनाच्या शुक्रवारी झालेल्या सोहळ्याची सुरुवात President Draupadi Murmu राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर कर्तव्यपथवर नारी शक्तीचे दर्शन घडले. कर्तव्यपथवर आयोजित मुख्य कार्यक्रमासाठी फ़्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक‘ाँ उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आणि युद्ध स्मारक परिसरात जाऊन हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथसिंह तसेच तिन्ही सैन्यदलांचे प्रमुखही उपस्थित होत
यावेळी प्रथमच तिन्ही सैन्यदल, निमलष्करी गट आणि पोलिस दलाचे नेतृत्व महिलांनी केले. तिन्ही सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व भारतीय लष्कराच्या कॅप्टन शरण्य राव यांनी केले. केंद्रीय सशस्त्र दलाच्या तुकडीत महिला कर्मचारीही सहभागी झाल्या. बीएसएफ, सीआरपीएफ आणि एसएसबीच्या महिला कर्मचार्यांनी 350 सीसीच्या रॉयल एनफिल्ड बुलेटवर स्वार होऊन साहसाचे दर्शन घडवले. कर्तव्यपथवर विविध राज्यांच्या चित्ररथांचे संचलन करण्यात आले. कर्तव्यपथवर भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता आणि प्रगती यासह वाढत्या स्वदेशी क्षमतांच्या पाठबळाने निर्माण झालेले लष्करी सामर्थ्य दिसून आले. सोबतच नारी शक्तीचे दर्शन झाले.
President Draupadi Murmu : प्रथमच 100 हून अधिक महिला कलाकारांनी भारतीय वाद्ये वाजवून पथसंचलनाची सुरुवात केली. शंख, नादस्वरम्, नगारा इत्यादी वाद्य संगीताने संचलनाची सुरुवात झाली. कर्तव्यपथवर पथसंचलनात पहिल्यांदाच तिन्ही संरक्षण दलातील महिलांच्या एकत्र तुकडीचा सहभाग देखील पाहायला मिळाला. महिला वैमानिकांनीही महिला शक्तीचे प्रतिनिधित्व करीत हवाई संचलनादरम्यान प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या तुकड्यांमध्ये केवळ महिला जवानांचा सहभाग होता.