अतिदुर्गम भाग सिरोंचा तालुक्यातील रेगुंटा येथील किरण कुर्मावार हिला उच्च शिक्षणासाठी लंडन येथे जायचे होते तिची हालाखीची परिस्थिती आहे ही स्वतः आपल्या वडिलांसोबत ड्रायव्हरकी करून उदरनिर्वाह करीत आहे यातच तिने उस्मानाबाद इथून उच्च शिक्षण घेतले आहे पुढील शिक्षणासाठी तिला लंडन येथे जायचे आहे करिता ही बातमी न्यूज चैनल वर आली आणि ही बातमी बघून रोटी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर रोहितजी माडेवार यांनी त्वरित मदतीचा हात समोर केला, आणि त्यांनी चौकशी करून अहेरी तालुक्यातील रवी नेलकुद्री यांच्याशी संपर्क केला आणि रवी यांनी तिचा संपर्क नंबर शोधून तिच्याशी संपर्क साधला आणि संपर्क साधल्यानंतर आज तिला डॉक्टर रोहितजी माडेवार, रोटी फाउंडेशन यांनी पाच लाख रुपयाचा चेक दिला व तिला भविष्यात येणाऱ्या सर्व अडथळे दूर करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन पण दिले यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम उपस्थित होते त्यांच्या हस्ते हा चेक तिला प्रदान करण्यात आला.
यावेळी जन संघर्ष समिती चे अध्यक्ष दत्ता शिर्के, प्रशांत शेंडे , प्रशांत नामेलवार ,राकेश कोसरे, विनोद जिल्लेवार, डॉ तिरुपती कोलावर , डॉ स्नेहल मेक्रतवार, सूचित कोडेलवार,रितिक कुंभारे,अनुराग पिपरे,आकाश तुलसीगिरी, रेगुंटा चे प्रभारी सानप साहेब, सूचित कोडेलवार ,प्रमोद भोयर, संतोष पडलवार, मल्लांना संघरथी , अजयजी , मुकेशी व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.