माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून 23001(तेवीस हजार एक) रुपयाचं प्रथम पारितोषिक
अहेरी विधानसभा क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या मूलचेरा तालुक्यातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येतात, त्यात प्रामुख्याने बंगाली बहुल भागात मोठ्या संख्येने फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात येते आणि या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक भाग घेऊन,उत्साहात आपल्या खेळाचं प्रदर्शन करतात, ग्रामीण भागात सोयीसुविधा अभाव असल्याने ग्रामीण भागातील खेळाडू थोडे कमी पडत असले तरी मोठ्या जोशाने ग्रामीण भागात फुटबॉल खेळ खेळला जातो.
माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे क्रीडा स्पर्धेला प्रोत्साहन देत असताना आणि आपल्या क्षेत्रातील युवकांना क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन आपलं भविष्य क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून घडवावे आणि आपल्या क्षेत्राचं नावलौकिक करावे यासाठी ते नेहमी युवकांना प्रेरीत करत असतात, दरवर्षी प्रत्येक क्रीडा स्पर्धेसाठी पारितोषिके देत असतात.
मुलचेरा तालुक्यातील श्रीनगर येथे आदर्श स्पोर्टिंग क्लब तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्या स्पर्धेसाठी माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून 23001(तेवीस हजार एक) रुपयाचं प्रथम पारितोषिक विजेत्या टीमला देण्यात आले,तर माजी जि प अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्या कडून 16001(सोळा हजार एक) रुपयाचं द्वितीय पारितोषिक देण्यात आले.
यावेळी आयोजित भव्य फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरक व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे हे होते,तर भाजपचे मूलचेरा तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता,अहेरी तालुका अध्यक्ष रवीभाऊ नेलकुद्री,माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती,उपसरपंच तपन मल्लिक,ग्रामपंचायत सदस्य बादल शहा,बबलू शील,विजय बिश्वास,संजू सरकार,किशोर मल्लिक तसेच परिसरातील फुटबॉल खेळाडू व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.