ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये प्रवेशास संधी

 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीअल इंग्रजी माध्यमाच्या स्कूलमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.00 ते 2:00 वाजेपर्यंत प्रवेशपूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

             शैक्षणिक सत्र 2024-25 या वर्षाकरिता इयत्ता सहावी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरून काढण्यासाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत एकलव्य रेसिडेन्सी मॉडेल स्कूल, अहेरी येथे परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. इयत्ता सहावीच्या प्रवेशा करिता 100 गुणांचा पेपर व सातवी ते नववी पर्यंतच्या प्रवेशाकरिता 200 गुणांचा पेपर घेण्यात येणार आहे. त्याकरिता इच्छुक व पात्र अनुसूचित जमाती/आदीम जमातीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सहा लक्ष पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी/पालकांनी परीक्षा आवेदन पत्र व सविस्तर माहिती करिता प्रकल्प कार्यालय, अहेरी येथे संपर्क करून दिनांक 30 जानेवारी 2024 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी केलेले आहे.