ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

अग्निवीर सैन्य भरतीसाठी अर्ज केलेल्यांसाठी महत्वाची बातमी

अग्निवीर सैन्य भरतीसाठी अर्ज केलेल्यांसाठी महत्वाची बातमी भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून भरतीसाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात २३ ऑगस्ट २०२२ ते ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत भरती मेळावा होणार आहे.

यासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्र तयार झाली आहेत. ती पत्रही ऑनलाइन उपलब्ध आहेत. अग्निवीर सैन्य भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना www.joinindainarmy.nic.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.

हे प्रवेश पत्र व आवश्यक त्या सर्व कागदपत्रानुसारच भरतीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सर्व विद्यार्थ्यांनी आतापासून आपली प्रवेशपत्र आणि संबंधित कागदपत्रे तयार करून घ्यावीत आणि ती सोबत घेऊनच भरतीच्या ठिकाणी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.