मुलचेरा :- भा.कृ.अनु.प.-केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर द्वारा जिल्ह्यातील अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी “शेतकरी प्रशिक्षण व कृषी निविष्ठा वितरण” कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली या गावात आयोजीत करण्यात आले होते हे कार्यक्रम केंद्र शासन पुरस्कृत अनुसुचित जमाती विकास कृती आराखडा (DAPST plan) डॉ. व्ही.एन. वाघमारे संचालक भा.कृ.सं.प.-केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर व डॉ. दीपक टी. नगराळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ (वनस्पती रोगशास्त्र) व कार्यक्रम समन्वयक यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली राबविला आले होते. यावेळी, फवारणी संरक्षण किट, लपेटा पाईप, जैविक खते, व पाण्यात विरघळणारे नत्र:स्फुरद:पालाश (१९:१९:१९) खते इत्यादी निविष्ठा उपस्थित अनुसूचित जमाती समूहातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले या कार्यक्रमावेळी संस्थेचे श्री. आर.एम.रामटेके, वरिष्ट तांत्रिक सहाय्यक,श्री. एस. एम. मराठे ग्राम. अधिकारी, श्री.आकाश लवटे, आत्मा कृषी विभाग मुलचेरा, श्री. गणेश हलामी, सरपंच, श्री. सारंग श्रीरामे, वाय. पी.१ तसेच गावातील प्रगतशील शेतकरी श्री. संदीप मट्टामी प्रामुख्याने उपस्थित होते. सुरुवातीला श्री आर. एम. रामटेके कपासीतील तण नियंत्रण, धान व कापूस चना या पिकांरील कीड व खत व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले. . एस. एम. मराठे गावातील विविध योजनाबद्दल माहिती दिली. तसेच श्री. आकाश लवटे यांनी कृषी विभागातील योजना व बचत गटाबद्दल माहिती दिली व श्री. सारंग श्रीरामे यांनी संचालन व आभारप्रदर्शन केले व कार्यक्रम यशस्वी आयोजनात श्री. संदीप मट्टामी यांचे सहकार्य लाभले.यावेळी बोलेपल्ली (मुलचेरा)या गावातील एकूण ६० आदिवासीं शेतकऱ्यांना या कार्यक्रमाचा लाभ झाला.





