शिवजन्मोत्सव समिती अहेरीच्या वतीने हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महोत्सव सोहळा दिनांक १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता.गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी शिवजयंती निमित्य महाराजांचे पूजन केले. त्यानंतर फटाक्याच्या आतिषबाजीत आणि भव्य बाईक रॅली काढून धूमधडाक्यात शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अहेरी नगरी दणाणून निघाला.!
शिवजयंती निमित्य काढलेल्या बाईक रॅलीत राज्याचे माजी राज्यमंत्री, तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सहभाग घेतला.
