अहेरी येथील नेहमी क्रीडा क्षेत्रात चर्चेत असणारी नागू कोडापे ही गेल्या १० दिवसापासून लूपस या आजारामुळे चंद्रपूर येथील यशोदा अँड हेल्थकेअर इथे ऍडमिट होती उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने नागू कोडापेला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे, नागपूर येथील प्रसिद्ध असलेला क्रीम्स हॉस्पिटलचा ICU मध्ये नागु कोडापेला भरती करण्यात आले आहे, तिला पुढील उपचाराकरिता घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याची माहिती मिळाली आणि लगेच माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी तातडीने १५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली तसेच डॉक्टरांशी बोलून नागपुरात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावे ह्यासाठी राजेंनी प्रयत्न केले.
Related Articles
शासकीय पत्रांवर मुद्रित होणाऱ्या बोधचिन्ह, घोषवाक्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण
मुंबई, दि. १० : मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवर बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य मुद्रित होणार असून त्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सर्व मंत्री महोदयांच्या आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण […]
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी सायकल अभियान’ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी चमूला राज्यपालांकडून कौतुकाची थाप
मुंबई ते गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे ४३० किमी अंतर सायकलने पूर्ण करणाऱ्या एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थी चमूला राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी नुकतेच राजभवन येथे कौतुकाची थाप दिली. तेरा सदस्यांच्या या सायकल अभियानाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल राज्यपालांनी दिव्यांग सायकलपटू मयूर दुमसिया यांचे अभिनंदन केले. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. हेमलता बागला, के. सी. महाविद्यालयाच्या प्राचार्य […]
हुतात्मा स्मृती दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून अभिवादन
मुंबई ,दि. २१ : हुतात्मा स्मृती दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर,पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस आयुक्त […]