एमपीएससी परीक्षेत अहेरी राजनगरीचा शुभम येलेश्वर कोमरेवार महाराष्ट्र राज्यात प्रथम..!!
सहाय्यक आयुक्त- Assistant Commissioner (मत्स्यव्यवसाय विभाग) म्हणून निवड..!!
अहेरीचा सुपुत्र शुभम कोमरेवार हा MPSC परीक्षेत नुकताच महाराष्ट्र राज्यात प्रथम आल्याने माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते काल “अहेरीचा राजा” राजमहाल, अहेरी येथील भव्य मंचावर शुभमचे शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून राजेंचा हस्ते काल सत्कार करण्यात आले, यावेळी शुभमचे आई वडील तसेच त्यांचे आप्त परिवार तसेच अहेरीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगराचे सुपुत्र राज्यस्तरावर प्रथम येणे हे या क्षेत्रासाठी गर्वाचे आणि अभिमानाचे गोष्ट आहे. आणि इतर युवा युवतींनी शुभमची प्रेरणा घेऊन ह्या भागातील व जिल्ह्यातील नाव उंचवावे असे प्रतिपादन राजे अंब्रिशराव आत्राम यांनी ह्यावेळी बोलताना केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२३ मध्ये सहाय्यक आयुक्त (मत्स्यव्यवसाय विभाग) या पदासाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाले असून अहेरी येथील शुभम येलेश्वर कोमरेवार याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
महापोर्टल द्वारे घेण्यात आलेल्या 2019 च्या परीक्षेत दहावा क्रमांक घेऊन सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी या पदी निवड झाली होती आणि गडचिरोली येथे सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी म्हणून कार्यालयात कार्यरत होते.
सध्या शुभम येलेश्वर कोमरेवार सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त कार्यालय हडपसर पूणे येथे कार्यरत आहे. आपल्या स्वजिल्ह्यात गडचिरोली येथे ही या पदावर उल्लेखनीय कार्य केलेले होते.
शुभमचा जन्म अहेरी येथे झाले.परंतु आई वडील शिक्षक असल्याने त्यांचे बदली झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत धानोरा तालुक्यात इरूपटोला येथे झाले.
गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी शाळेत त्याचे माध्यमिक शिक्षण झाले तर महाविद्यालयीन शिक्षण – मत्स्य व पशुधन विद्यापीठ नागपूर येथे झाले.
इयत्ता दहावी नंतर त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ध्येय मी निश्चित केल होत. मात्र त्यासाठी लागणारी तयारी, क्लासेस हे गडचिरोलीत उपलब्ध नव्हते. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षेसाठी करावी लागणारी तयारी याचा कोणताही अंदाज आपल्याला नव्हता परंतु त्यांनी जिद्द सोडले नाही आणि अविरत अभ्यास सुरू होते. या यशानंतर माझे आत्मविश्वास अधिक वाढले असून माझ्या कार्याने जास्तीत जास्त लोकांचे सेवा करता येईल असे मनोगत सहाय्यक आयुक्त शुभम कोमरेवार यांनी मांडले.
शुभमने या यशाचे श्रेय आई वडीलांच्या पुण्याईला दिले आहे..!!
राज्यात पहिला आलेला शुभम येलेश्वर कोमरेवार
हा मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी राजनगरीचे आहे. शुभमचे वडील येलेश्वर कोमरेवार सेवानिवृत्त केंद्र प्रमुख तर आई सौ रत्नप्रभा येलेश्वर कोमरेवार पदविका शिक्षक आहेत.
कमी वयात दैदीप्यमान यश संपादन केल्याबद्दल शुभमचे जिल्ह्यात सर्वत्र विविध क्षेत्रातून कौतुक होत आहे..!!