सध्या सोशल मीडियावर आलियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु असताना झोपलेली दिसत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑक्टोबर रोजी एनएसएसीसीला हजेरी लावली. त्यांच्या हस्ते एनएमएसीसीच्या १४१व्या आयओसी सत्राचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला राजकीय मंडळींसोबतच काही कलाकार मंडळी देखील उपस्थित होती. या उद्घाटन सोहळ्याला नरेंद्र मोदी यांनी भाषण दिले. सध्या सोशल मीडियावर या सोहळ्यातील फोटो व्हायरल झाले आहेत. दरम्यान, आलिया भट्टच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
एनएमएसीसीच्या १४१व्या आयओसी सत्राच्या उद्घाटन सोहळ्याला शाहरुख खान, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर आणि आलियी भट्ट हे कलाकार उपस्थित होते. दीपिका आणि शाहरुख शेजरीशेजारी बसले होते. त्यांच्या मागच्या रांगेत आलिया आणि रणबीर बसले होते. सध्या सोशल मीडियावर या सोहळ्यातील एक फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोमध्ये आलिया चक्क झोपलेली दिसत आहे.
