गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

समाजातील सर्व बांधव एकत्र येऊन समाज पुढे नेण्याची गरज आहे.- राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे प्रतिपादन!

समाजातील सर्व बांधव एकत्र येऊन समाज पुढे नेण्याची गरज आहे.- राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे प्रतिपादन!

अहेरी येथील स्थानिक दक्षिण मुखी हनुमान मंदिर समोरील परिसरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले माळी समाज समिती अहेरी तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम,अध्यक्ष स्थानी सौ. जयश्री खोंडे ,उद्घाटक ऍड. प्रीती डंबोळे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रमुख उपस्थिती म्हणुन कु.करिश्मा मोरे पोलिस उपनिरीक्षक पो.स्टेशन अहेरी, जयश्रीताई नालमवार अध्यक्ष समर्पण वृद्धाश्रम आलापल्ली, सौ.मिनाबाई ओंडरे सभापती नगरपंचायत अहेरी, ऍड. दहागावकर ,रवि नेलकुद्री सामाजिक कार्यकर्ते, विकास उईके नगरसेवक नगरपंचायत अहेरी,रामचंद्र गुरुनुले सेवानिवृत्त शिक्षक, अशोक निकुरे सेवानिवृत्त शिक्षक,आदी उपस्तीत होते!

त्यावेळी परिस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत देशातील महिलांच्या शोषण विरुद्ध व त्यांना समान संधी, अधिकार मिळवून देण्यासाठी प्रस्थापित जात्यांध शक्तीचा विरोध पत्करून शिक्षणाची संधी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले या आधुनिक भारताच्या भाग्यविधात्या आहेत.त्यांनी स्त्री शिक्षणाचा जागर संपूर्ण जगाला दिला असे प्रतिपादन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले.

अहेरी येथील फुलमाळी समाज द्वारा आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.सर्वप्रथम मान्यवरांनी सावित्रीबाई फुले व महापुरुषांचे पूजन केले. ते पुढे म्हणाले की, त्याकाळात मुलींना शिक्षण घेण्याची मुभा नव्हती.अशा परिस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करून स्त्रीयांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांना जोडलं.पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात देशातील मुलांची पहिली शाळा सुरू केली.त्यानंतर चार वर्षातच एकोणविस शाळा सुरू करून भारताच्या प्रथम मुख्याध्यापिका होण्याचा मान त्यांनी प्राप्त केला.१८५२ मध्ये उत्कृष्ठ शिक्षिका म्हणून सन्मान ही करण्यात केला.एवढा उत्तुंग कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे होते. त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या समाजातील महिला व पुरुषांनी एकत्र येऊन समाज पुढे करण्यास पुढाकार घ्यावा असे राजे अम्ब्रिशराव आत्राम म्हणाले.!