महाराष्ट्रात लवकरच ‘ऑल वूमेन टूरिझम’ संकल्पना राबवली जाणार आहे. ‘सब कूछ महिला’ असे या संकल्पनेचे स्वरूप आहे. महिलांसाठी सहली आयोजित करणाऱ्या संस्थांचे मार्गदर्शन घेणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
राज्यातील पर्यटन सुविधांचा मेक ओव्हर केला जाईल. पर्यटनस्थळी महिलांच्या सहलींचे आयोजन, त्यांच्या गाड्यांचे चालक-वाहक, गाईडही महिला, तसेच, मुक्कामाच्या ठिकाणीही महिला पोलिसांची सुरक्षा, अशी ही ‘ऑल वूमेन टूरिझम’ची संकल्पना आहे.
पर्यटन सुविधा दिल्या जातील
प्रत्येक जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रातील लोकांची 15 जणांची समिती नेमली जाईल. या समितीच्या शिफारशींनुसार विकास केला जाईल. राज्यातील 16 प्रमुख ट्रेकिंग स्थळांवर, तसेच प्रमुख गड-किल्ल्यांवर पर्यटन सुविधा निर्माण करण्यात येतील.
राज्यातील महत्त्वाच्या 12 पर्यटनस्थळांवर पर्यटन मेळाव्यांचे आयोजन केले जाईल. त्यात स्थानिक लोककला, हस्तकला उत्पादनांना प्रोत्साहन दिलं जाईल. सांस्कृतिक कार्यक्रम होतील. दरवर्षी एक लाख महिलांना रोजगार मिळवून देणारे धोरण जाहीर करू, असे लोढा म्हणाले.