पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे जिल्ह्यातील तब्बल 500 कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील 5 हजार तरुणांना रोजगार मिळेल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
पीएम मोदी यांनी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रोजेक्ट नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत असेल, असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
*रांजणगावात होणार प्रकल्प*
रांजणगावात तब्बल 297.11 एकरावर इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प होणार आहे. त्याच्या विकासासाठी 492.85 कोटी रुपये खर्च केले जातील. त्यातील 207.98 कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे.
तसेच, CDAC कंपनीही पुण्यात 1 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 5 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती फडवणीस यांनी दिली.
