ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विविध देशांच्या मुंबईतील राजदूतांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

मुंबई, दि. १६ : विविध देशांचे मुंबईतील राजदूत, वाणिज्य दूत तसेच मानद राजदूत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या मुंबई दूतावासाच्या प्रमुख व डीन ऑफ काॅन्सुलर कोर अँड्रिया कून तसेच कॉन्सुलर कोर संघटनेचे उपप्रमुख विजय कलंत्री यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या शिष्टमंडळात ३५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सध्याचे युग हे परस्पर सहकार्याचे आहे. अश्यावेळी विविध देशांच्या प्रतिनिधींमध्ये सहकार्याची भावना असणे आवश्यक आहे. भारताकडे जी – २० देशांच्या परिषदेचे यजमानपद आहे. या पार्श्वभूमीवर सर्व देशांचे भारताशी असलेले संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

यावेळी सर्व प्रतिनिधींनी राजभवनातील ऐतिहासिक स्थळांना भेट दिली तसेच क्रांतिकारकांच्या भूमिगत दालनाची पाहणी केली.

०००

Diplomats of 35 countries meet Governor Koshyari

Diplomats, Consuls and Honorary Consuls of 35 countries based in Mumbai met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari on Mon (16 Jan).

The group of diplomats was led by the Dean of the Consular Corps and Consul General of South Africa in Mumbai Andrea Kuhn and Vice Chairman of the Association Vijay Kalantri.

Interacting with the diplomats the Governor said the world is moving towards an age of cooperation. Mentioning that India is heading the G – 20 countries at the most appropriate juncture, he expressed the need to foster and further strengthen cooperation among all countries.

The group of diplomats had a walk around the Raj Bhavan premises and visited the underground ‘Gallery of Revolutionaries’ created in the Raj Bhavan Bunker.