ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अमृत बेकरी प्रशिक्षण योजना

अमृत बेकरी प्रशिक्षण योजना (Amrut Bakery Prashikshan Yojana) ही महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी एक निवासी प्रशिक्षण (Amrut Bakery Prashikshan Yojana) योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लक्षित गटातील उमेदवारांना बेकरी उत्पादनांवर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रेरित करणे आणि मार्गदर्शन करणे.

अमृत बेकरी प्रशिक्षण योजना 

​अमृत बेकरी प्रशिक्षण (Amrut Bakery Prashikshan Yojana) योजना ही महाराष्ट्र शासनाच्या अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग (AMRUT) या स्वायत्त संस्थेमार्फत राबवली जाते. या योजनेचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींना बेकरी व्यवसायाचे तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे.​

योजनेचा उद्देश:

अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी बेकरी उत्पादनांवर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण (Amrut Bakery Prashikshan Yojana) कार्यक्रम राबवून त्यांना मार्गदर्शन करून नवव्यवसाय उभारणीस प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे.

लाभार्थी पात्रता निकष:

अमृत बेकरी प्रशिक्षण (Amrut Bakery Prashikshan Yojana) योजनेचे लाभार्थी पात्रता निकष पुढील प्रमाणे असतील :

१ . अर्जदार अमृतच्या लक्षित गटातील असावा.

२ . उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु, ८ लाख पेक्षा कमी असावे, त्यासाठी संबंधित प्राधिकृत अधिकारी यांचा उत्पन्नाचा वैध दाखला आवश्यक.

३. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.

४. अर्जदार पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य. (किमान पदवीचे शिक्षण चालू असणे / तांत्रिक शिक्षण किंवा बारावी उत्तीर्ण अपेक्षित).

५. उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष जास्तीत जास्त ६० वर्ष असणे आवश्यक.

६. अर्जदार स्वतः उद्योग करण्यासाठी इच्छूक असावा.

७. सदर प्रशिक्षण कार्यक्रम कालावधीत उमेदवाराने उद्योजकीय आकांक्षेसाठी पूर्णवेळ पाठपुरावा करणे आवश्यक राहील.

८. या कालावधीत उमेदवाराने अमृत बेकरी प्रशिक्षण (Amrut Bakery Prashikshan Yojana) योजने सारख्या अन्य कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

अमृत योजने अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारे लाभ :

१. अमृत बेकरी (Amrut Bakery Prashikshan Yojana) प्रशिक्षण योजना १८ दिवस पूर्णपणे निशुल्क निवासी स्वरुपाची असून त्यामध्ये भोजन व्यवस्थेचा अंतर्भाव आहे.

२. या प्रशिक्षणामध्ये पहिले १२ दिवस Technical Inputs (Theory & Practical) हे असून पुढील ६ दिवस Entrepreneurship Development Inputs हे असतील.

या प्रशिक्षणानंतर लाभार्थ्यांना देण्यात येणारे लाभ :

उद्योग / व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक मदत, सहाय्य, सहकार्य : लाभार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष उद्योग / व्यवसाय उभारणी साठी खालील बाबतीत Hand holding च्या माध्यमातून खालील बाबतीत मार्गदर्शन करण्यात येईल.

  • जागेची निवड
  • मशिनरीची निवड
  • प्रकल्प अहवाल तयार करणे
  • आवश्यक परवाने
  • उद्योग नोंदणी
  • कर्ज प्रस्ताव तयार करणे
  • कच्चा माल खरेदी
  • उत्पादित माल विक्री व्यवस्थापन मार्गदर्शन
या प्रशिक्षणानंतर लाभार्थ्यांना देण्यात येणारे उद्योग व्यवस्थापन मार्गदर्शन :

प्रशिक्षणानंतर प्रशिक्षनार्थी आपले उद्योग निश्चित करतील व त्यानंतर उद्योग उभारणीसाठी लागणारे भांडवल शासनाच्या विविध कर्ज / अनुदान अमृत बेकरी प्रशिक्षण (Amrut Bakery Prashikshan Yojana) योजनेशी सांगड घालून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. कर्ज प्रकरण करणे हि प्रशिक्षनार्थींची व्यक्तिगत जबाबदारी राहील व ते करण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केद्र सहकार्य करेल.

आवश्यक कागदपत्रे:
  • आधार कार्ड.
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे.​
  • आवास प्रमाणपत्र.​
  • बँक पासबुक किंवा रद्द केलेला चेक.​
  • पासपोर्ट साइज फोटो.
अमृत योजने अंतर्गत लाभासाठी अर्ज करा – (Apply Online Amrut Bakery Prashikshan Yojana)

अमृत बेकरी प्रशिक्षण (Amrut Bakery Prashikshan Yojana) योजनेच्या वर नमूद अटी व शर्तीची पूर्तता करणारे अर्जदार यांनी खालील संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. आवश्यक कागदपत्रांसह स्वयंस्वाक्षांकित करून संबंधित महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED)च्या कार्यालयास उपस्थीत राहणे आवश्यक राहील.

https://mced.co.in/Amrut/index.html