गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अवकाळी पावसाने केला स्वीटीचा घात वाटेने स्वीटीला आई-वडिलांपासून हिरावले

चामोर्शी :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर शाळेतून घरी परत जात असतांना अवकाळी पावसामुळे व विजेमुळे वाटेतच अंगावर वीज कोसळल्याने विश्वशांती विद्यालय कुनघाडा रै येथे शिक्षण घेणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनी स्वीटी बंडू सोमनकर ( वय १५) रा मालेर चक हिला काढाणे हिरावून घेतले. ही घटना १८ मार्च रोजी सकाळी १० ते १०.३० च्या सुमारास बाजारपेठ( कुनघाडा रै ) ते मालेर चक च्या मधोमध पुलाजवळ घडली

मृत स्वीटी बंडू सोमनकर ही विद्यार्थिनी विश्वशांती विद्यालय कुनघाडा रै येथे वर्ग ९ वी मध्ये शिक्षण घेत होती नेहमी प्रमाणे ती मालेर चक वरून कुनघाडा रै येथे शाळेत सायकलने येजा करीत होती १० वी व १२ बोर्डाची परीक्षा सुरू असल्यामुळे शाळा सकाळ पाळीत सुरू असल्यामुळे स्वीटी सकाळी ७ वाजता स्वगाव मालेर चक वरून शाळेला निघाली ९.३० वाजता शाळा करून सुट्टी झाल्यानंतर परत स्वगावी घरी जात असतांना वाटेतच पावसाला सुरुवात होऊन ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला त्याच वाटेने व त्याच सुमारास मालेर माल व मालेर चक येथील शाळकरी विद्यार्थी व विद्यार्थिनी सुध्दा जात होते काही मागे तर काही पुढे होते स्वीटी ही सर्वांच्या मध्ये एकटीच जात होती अचानकच विजांचा कडकडाट होऊन तिच्या अंगावर वज्रघात झाल्यामुळे ती खाली कोसळली तात्काळ तिला प्राथमिक आरोग्य केंद्र कुनघाडा रै येथे नेण्यात आले परिस्थिती गंभीर असल्यामुळे तिला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सर्व गावकरी घटना स्थळाकडे धाव घेऊन हडळ व्यक्त करण्यात आले तर शिक्षक व विद्यार्थी मित्र-मैत्रिणी यांच्या डोळ्यात अश्रू पानावत होते तर आई-वडिलांच्या आणि भावाच्या आक्रोश पाहून मन हेलावून जात होते. स्वीटीही हुशार मनमिळावू असल्याने सर्वांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत होते एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. अन तिचा सायकलचा प्रवास तिथेच थांबला.