मुलचेरा:-
भारतीय रिझर्व बँकेच्या वित्तिय समावेशन विभागांतर्गत, बँक ऑफ महाराष्ट्र संचालित क्रिसिल फाउंडेशन यांच्या सहकार्याने मुलचेरा येथे मानिवाईज वित्तीय साक्षरता सेंटर ची स्थापना करण्यात आली. १ नोव्हेंबर २०२२ ला साक्षरता सेंटर ने एक वर्ष पूर्ण करून दुसर्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्याने सेंटर ला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संवर्ग विकास अधिकारी मा. एम रामटेके सर यांनी उपस्थित महिलांना बचत व गुंतवणूक आणि बचत गटा अंतर्गत उधोगधंदा निर्माण करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित ता. समन्वयक वाय. उंदिरवाडे, सा. कार्यकर्ते गोविंदा मंडल, प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौ. शीला गणपती, ग्रा. पं. सदस्य सौ. पुष्पश्री मुखर्जी, केंद्र व्यवस्थापक अंकुश निमसरकार, फि.स. हर्षवर्धन झाडे, फि.स. प्रमेश वेलादी, फि.स. सुरज सोनटक्के व महिला उपस्थित होत्या.