महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE / NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.
योजनेच्या लाभासाठी पात्रता:
1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
2. उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.
3. उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी.
4. जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी.
5. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा, ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनूसार अपलोड करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
1. 9 वी ची गुणपत्रिका
2. 10 वी परिक्षेचे ओळखपत्र
3. आधार कार्ड
4. रहिवासी दाखला
5. जातीचे प्रमाणपत्र
6. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
अटी व शर्ती :
1. अर्ज करण्याचा अंतिम दि. 31/03/2023 आहे.
2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
4. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा संर्पक क्र- 0712-2870120/21 E-mail Id: [email protected]
5. 10 वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांकडून 10 वी ची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व MHT-CET/JEE/NEET या परिक्षेची तुमारी करत आहोत असे हमीपत्र मागविण्यात येतील.
अर्ज कसा करावा.
1. महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील ” Application for MHT-CET/JEE/NEET 2025 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
2. अर्जासोबत वरील आवश्यक कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.
ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.