ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विधानपरिषदेत तालिका सभापतींची नेमणूक

मुंबई दि. २७- अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२-३ साठी विधानपरिषदेत तालिका सभापतींची उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी घोषणा केली.

विधानपरिषद सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, जयंत आजगावकर यांची तालिका सभापती म्हणून नेमणूक करण्यात आली.

दरम्यान, विद्यमान विधानसभा सदस्य लक्ष्मण जगताप, माजी विधानसभा सदस्य सर्वश्री जयप्रकाश छाजेड, सुमंत गायकवाड यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी शोकप्रस्ताव मांडला.