ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नौकारी विशेषक योजना माहिती विदर्भ

अर्ज एक योजना अनेक : महत्वाची शेतकरी योजना

कृषी विभागामार्फत विविध अश्या योजनांचा लाभ शेतकरी बंधूना एकाच अर्जाद्वारे मिळविण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सर्व योजनांसाठी फक्त एक अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविली जाते या प्रक्रियेलाच ” अर्ज एक योजना अनेक ” arj ek yojana anek Mahadbt असे संबोधले जाते. तसेच अर्ज भरण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबी निवडण्याचे स्वतंत्र देण्यात आले असून त्यांच्या सोयीनुसार शेतीच्या विविध घटकासाठी ते अर्ज करू शकतात.

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत :

ट्रॅक्टर

ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चलित अवजारे

प्रक्रिया संच

पावर टिलर

बैलचलित अवजारे

मनुष्यचलित अवजारे

स्वयंचलित अवजारे

कल्टीवेटर

कापणी यंत्र

नांगर

पेरणी यंत्र

मल्चिंग यंत्र

मळणी यंत्र

रोटावेटर

वखर

सिंचन साधने व सुविधा योजने अंतर्गत :

ठिबक सिंचन

तुषार सिंचन

पंपसेट / इंजिन / मोटर

पाईप्स

वैयक्तिक शेततळे

शेतातील तलावामध्ये प्लास्टिक अस्तर

फलोत्पादन योजने अंतर्गत :

कांदा चाळ

पॅक हाऊस

जुन्या फळबागांचे पुनरुजीवन

फळबागांना आकार देणे

फळबाग लागवड

मधुमक्षिकापालन

हरितगृह

शेडनेट हाऊस

प्लास्टिक मल्चिंग

फॉर्म भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

७/१२ उतारा

८ अ उतारा

बँक पासबुक

आधार कार्ड

मोबाईल क्रमांक

जातीचे प्रमाणपत्र ( आवश्यक असल्यास )

अर्ज कसा आणि कुठे करावा ?

अर्ज करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर तुम्हांला उजव्या बाजूला शेतकरी योजना असा ऑपशन दिसेल. त्यावर क्लिक करा.

नवीन अर्जदार असाल तर नोंदणी करून घ्या अथवा नोदंणी झालेली असेल तर लॉगिन करून विविध घटकासाठी तुम्ही अर्ज करू शकता.

हा अर्ज तुम्ही वैयक्तिक मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट तसेच जवळच्या CSC केंद्रामध्ये म्हणजेच कॉमन सर्विस सेन्टरमध्ये जाऊन करू शकता.

” एक अर्ज योजना अनेक “ या उपक्रमाअंतर्गत प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, कृषी सहायक /कृषी अधिकारी यांच्यामार्फत मोका तपासणी, निवड झालेल्या लाभार्थ्यंच्या खात्यावर थेट अनुदान वितरण इत्यादी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.

इच्छुक शेतकरी अर्ज करून विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात, तर शेतकरी बांधवानो अर्ज करा आणि लवकरात लवकर लाभ घ्या.

योजनेचे नाव अर्ज एक योजना अनेक (महाडीबीटी शेतकरी पोर्टल)
लाभार्थी व्यक्ती पात्र शेतकरी वर्ग
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
अनुदान मर्यादा विविध घटकानुसार अनुदान देय
विविध घटक कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे औषधे व खते, फलोत्पादन

अशाप्रकारे शेतकरी मित्रांनो, mahadbtmahait farmer पोर्टलच्या माध्यमातून “अर्ज एक योजना अनेक” या अंतर्गत तुम्ही शेतीसाठी लागणाऱ्या विविध घटकासाठी अर्ज करून ती उपकरणे अनुदान तत्वावर मिळवू शकता.