दिनांक 19 एप्रिल 2023 ला स्थानिक नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यशालेकरिता डॉ. विवेक जोशी सहाय्यक प्राध्यापक, इंग्रजी विभाग, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविदयाल्याचे प्राचार्य डॉ. रंजित मंडल उपस्थिती होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हरिशिव प्रसाद उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ विवेक जोशी यांनी चार वर्षीय पदवी आणि पारंपारिक पदवी यामधील फरक त्यांनी समजावून सांगितले तसेच कौशल्य आधारित विकास अभ्यासक्रम कसा डिझाईन केला जातो आणि त्याचे कसे महत्त्व आहेत याबद्दल मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळा करिता शहीद वीर बाबुराव माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय मुलचेरा, भगवंतराव माध्यमिक आश्रमशाळा मुलचेरा, नेताजी सुभाषचंद्र कनिष्ठ महाविद्यालय सुंदरनगर आणि नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथील एकूण 150 विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.
सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.गौतम वाणी यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हरिशिव प्रसाद सर यांनी केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. शनवारे सर यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.