गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

तुमिरकसा येथील तेरवी कार्यक्रमाला भाग्यश्रीताई आत्राम यांची उपस्थिती

अहेरी तालुक्यातील मौजा तुमिरकसा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व मेडपल्ली ग्राम पंचायतचे सदस्य स्व.बाजीराव डोलू तलांडी यांच्या तेरवीचा कार्यक्रमाला माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम प्रामुख्याने उपस्थित राहून आदिवासी समाजातील पारंपरिक पद्धतीने सुरू असलेले तेरवी पुजा केले.

एवढेच नव्हेतर स्व.बाजीराव तलांडी यांची पत्नी सौ.गिरजा तलांडी, वडील डोलू तलांडी,मुलगा नागेश तलांडी, भाऊ लालू तलांडी, बाबुराव तलांडी इत्यादी कुटुंबीयांचे कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करत आस्थेने विचारपूस केले.

यावेळी येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे, कमलापुर चे माजी सरपंच संबय्या करपेत,सामाजिक कार्यकर्ते बाबुराव तोरेम,ग्रा प सदस्य वामन मडावी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तिरुपती मडावी, देवाजी सडमेक, लक्ष्मण मडावी, वारलु तलांडी, लालचंद तलांडी, मासू गावडे, विलास वेलादी, अनिल दुर्गे, मंगेश आत्राम, वारलु आत्राम, साधु आत्राम, तुमिरकसा गावातील दिवाकर तलांडी, महारू तलांडी, राकेश तलांडी, दलसू पुंगाटी व सर्व तुमिरकसा गावातील नागरिकांसह स्व. बाजीराव तलांडी यांचे नातेवाईक हे अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड या तालुक्यातील नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.