ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अहेरी राजनगरीतील विविध समाजाचा कोजागिरी कार्यक्रमाला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची उपस्थिती.

अहेरी राजनगरीतील विविध समाजाचा कोजागिरी कार्यक्रमात माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी काल उपस्थिती दर्शवून विविध समाजबांधवाशी आस्थेने संवाद साधला, राजे धर्मराव सायन्स कॉलेज येथे आयोजित कुणबी समाजाची कोजागिरी, माता कन्यका मंदिरात आयोजित कोमटी समाजाची कोजागिरी, विर ब्रह्ममगारु मंदिरात आयोजित सोनार समाजाची कोजागिरी तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित पद्मशाली समाजाची कोजागिरी कार्यक्रमांना काल राजेंनी उपस्थिती दर्शविली, ह्यावेळी बंधू कुमार अवधेशराव बाबा सोबत होते.

विविध समाजबांधवानी ह्यावेळी राजेंचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला, प्रत्येक ठिकाणी त्या त्या समाजबांधवाची मोठी गर्दी झाली होती, अनेकांनी राजेंसोबत छायाचित्रे घेतली..!!