ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महामंडळाच्या थकीत कर्जदारांसाठी एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत परतावा योजना

गडचिरोली: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या (ओ.बी.सी.महामंडळ) थकीत कर्ज प्रकरणात लाभार्थ्यांसाठी एकरक्कमी परतफेड योजना (OTS) 31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. महामंडळाच्या गडचिरोली जिल्ह्यातील थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये मिळणार पॉलिक्लिनिक सेवा

गडचिरोली :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र गोकुलनगर व रामनगर गडचिरोली येथे विशेष तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून विशिष्ट सेवा पुरविण्याकरिता आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांच्या हस्ते सुरवात करण्यात आले. सदर सेवांचा उद्देश म्हणजे स्त्री रोग उपचार, बालरोग उपचार, नेत्ररोग उपचार, कान-नाक-घसा रोग उपचार, मानसिक रोग उपचार, त्वचा रोग उपचार इत्यादी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आज उद्घाटन

गडचिरोली दि. 8 : गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे उद्घाटन 9 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात येणार आहे.  वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्यपाल सि.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रसाद नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात ‘शक्ती पेटी’ चे वितरण

बारामती वकील संघटनेच्यावतीने आयोजित संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शक्ती अभियानाअंतर्गत शहरातील शाळेस प्रातिनिधिक स्वरुपात ‘शक्ती पेटी’ चे वितरण करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रभाकर बर्डे, उपाध्यक्ष ॲड.प्रिती शिंदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ पुढील पाच वर्ष चालू राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर येथे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ वचनपूर्ती सोहळा राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील 2 कोटी 20 लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत आहे. हा आनंद […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांमध्ये भारताच्या गुंतवणुकीचे स्वागत करू’ : अध्यक्ष मोहमद मुईझ्झु

चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका निर्मात्यांचे देखील मालदीवमध्ये स्वागत  मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र असून महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये व्यवसायाची मोठी क्षमता असल्याचे सांगून मालदीव भारताकडून पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमधील गुंतवणुकीचे स्वागत करेल, असे प्रतिपादन मालदीवचे अध्यक्ष डॉ  मोहमद मुईझ्झु यांनी आज येथे केले. या संदर्भात उभय देशांनी दिल्ली येथे स्वीकारलेले ‘व्हिजन डॉक्युमेंट’ भारत आणि मालदीवमधील द्विपक्षीय संबंधांना […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ७० वे ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ प्रदान

मिथुन चक्रवर्ती ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित  70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती […]

Uncategorized

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या राज्यातील विविध प्रकल्पांचे ई -भूमिपूजन, उद्घाटन

राज्यात ७ हजार ६४५ कोटी रुपयांच्या कामांची उभारणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या ९ ऑक्टोबर रोजी राज्यात ७ हजार ६४५ कोटी रुपयांहन अधिक किंमतीच्या विविध प्रकल्पांच्या कामांची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर व शिर्डी विमानतळ येथील कामांचे भूमिपूजन आणि राज्यातील नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ग्रामीण भागातील सर्वसामान्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आयुष्मान भारत नोंदणी उपक्रमाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ ग्रामीण भागातील व सर्वसामान्य लोकांना त्यांच्या आरोग्याच्या गरजेनुरूप सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी डिजिटल दवाखान्याची सुविधा महत्वपूर्ण ठरेल. याद्वारे शंभर प्रकारच्या विविध चाचण्यांसह आरोग्य विभागाच्या योजना व त्याची नोंदणी सर्वसामान्यांना विनासायास करता येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वेगवेगळ्या संस्थांनी मिळून सीएसआर निधीच्या माध्यमातून सुरू करण्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

जिल्हा परिषदेतर्फे पेसा क्षेत्रात 44 उमेदवार नियुक्त

गडचिरोली दि.7: जिल्हा परिषदेतर्फे पेसा क्षेत्रांसाठी 37 ग्रामसेवक व 7 अंगणवाडी पर्यवेक्षक‌ असे 44 उमेदवारांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले. पेसा क्षेत्रात तातडीने नियुक्ती देण्यासंदर्भात 5 ऑक्टोबर रोजी च्या शासन आदेशानुसार शनिवार व रविवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनात तातडीने उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली व आज नियुक्तीपत्रही […]