गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

मोहुर्ली येथे वीर बाबुराव शेडमाके यांची शहिद दिवस साजरा

मुलचेरा :- तालुक्यात मोहुर्ली येथे २१ऑक्टोबर रोजी  वीर बाबुराव शेडमाके शहिद दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.विकास नैताम नगराध्यक्ष नगरपंचायत मुलचेरा कार्यक्रमाचे उदघाटन श्री तालांडे साहेब नायब तहसीलदार तहसील कार्यालय मुलचेरा यांच्या हस्ते करण्यात आला.प्रमुख पाहुणे दिनेश पेंदाम,श्री.कुळमेथे साहेब,श्री पवन आत्राम,प्रभाकर मडावी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.विकास नैताम नगराध्यक्ष नगरपंचायत मुलचेरा यांनी शहिद वीर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

खरीप पणन हंगाम 2022-23 साठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करीता दिनांक 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

गडचिरोली: महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादीत नाशिक,उप प्रादेशिक कार्यालय,अहेरी (उच्च श्रेणी ) अंतर्गत शासनाच्या निर्देनुसार खरीप पणन हंगाम 2022-23 साठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करीता निर्णयनुसार दिनांक 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ मिळालेली असून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक,उप प्रादेशिक कार्यालय,अहेरी (उच्च श्रेणी ) मार्फत महामंडळाचे एटापल्ली येथे खरेदी केंद्र सुरु […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

अहेरी विधानसभा क्षेत्रातील खांदला (राजाराम) आणि मन्नेराजाराम येते भाजपाचे सरपंच यांचा दणदणीत विजय

राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या उपस्थितीत फटाके फोडून, मिठाई वाटून, प्रचंड नारेबाजी करीत भाजपा कार्यकर्त्यांनी केला विजयाचा जल्लोष अहेरी:-ग्रामपंचायत निवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झाला असून, त्यात माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या नेतृत्वाखाली अहेरी विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टी पॅनलचे अहेरी तालुक्यातील खांदला ( राजाराम ) येते सुमनताई आलम यांचा सरपंच पदी तथा भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणाद्वारे आदर्श पिढी घडविण्याचे काम करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिक्षण हा शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून राज्याच्या शिक्षण विभागाचे काम पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने सुरू आहे. शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षकांनी देखील दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांची आदर्श पिढी घडविण्याचे काम करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर निकषांची पूर्तता करणाऱ्या सर्व माध्यमांच्या शाळांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आ.धर्मराव बाबा आत्राम यांचा वाढदिवस हजारो कार्यकर्त्यांचा उपस्थितीत उत्साहात साजरा

अहेरी:- माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांचा वाढदिवस जिल्हाभरातील हजारो कार्यकर्त्यांचा उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. 20 ऑक्टोबर हा दिवस अहेरी राज परिवारातील सदस्यांसाठीच नव्हेतर जिल्हाभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचा दिवस असतो.दरवर्षीच या दिवशी धर्मराव बाबा आत्राम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.यंदा सुद्धा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राजे साहेबांची ऊर्जा मित्र टिम एटापल्ली-भामरागडला आर्थीक मदत

अहेरी:- भामरागड-एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागात जिथे अद्यापही विज व गॅस पोहोचणे दुरापास्त आहे अशा भागात प्रकाशाचे किरण ठरलेले ऊर्जा मित्र टिमची दखल भारत सरकारने घेतली.भारतीय ऊद्योग संघ (CII) मार्फत दिल्लीला होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील “आत्मनिर्भर भारत प्रदर्शनी” मध्ये प्रकल्प सादर करण्यासाठी या टिमला आमंत्रीत करण्यात आले. अपारंपारीक ऊर्जा क्षेत्रात जनजागृती करणे व लोकांना या क्षेत्राचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानीची पुर्वसुचना विमा कंपनीस द्यावे

गडचिरोली: जिल्हयात ऑक्टोबर 2022 मधील झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकाचे प्रमाणावर नुकसान झालेले आहे. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासाच्या आंत या बाबतची सुचना विमा कंपनीच्या Crop Insurance App, टोल फ्री क्रमांक, कंपनीच्या इ-मेल आयडी, संबंधित बँक तसेच कृषि विभागाचे कार्यालय येथे देण्यात यावी. शेतकऱ्याने नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कल्याण संघटक व लिपीक टंकलेखक पद कंत्राटी पध्दतीने गडचिरोलीत भरती

गडचिरोली: जिल्हा सैनिक कल्याण कक्ष,गडचिरोली करीता सैनिक प्रर्वगामधुन अशासकीय,निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधन रुपये 13,323/- कंत्राटी पध्दतीने कल्याण संघटक व लिपीक टंकलेखक 2 पदे ( 175 दिवसा करीता फक्त्) भरावयाचे आहे. सदर पदासाठी इच्छूक माजी/आजी माजी सैनिक पत्नी /विधवा पत्नी यांनी या कार्यालयात दिनांक 07 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 12.30 वाजता सैन्य सेवेतील संपुर्ण मुळ […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

सर्व जनतेस तसेच प्रवासी बस मालक व चालक यांना सुचना

गडचिरोली: सर्व जनतेस तसेच प्रवासी बस मालक व चालक यांना सुचित करण्यात येते की, गडचिरोली जिल्हयातील खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्याठिकाणापासून कि.मी.प्रमाणे बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भांडे बाबतचा विहित नमुना तक्ता तयार करुन व त्याप्रमाणे येणारा प्रति आसन दर दर्शवून सदर खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रसिध्द करणे […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

विश्लेषण: पुण्यात अचानक इतका पाऊस का पडला? तब्बल ३३९ टक्के अतिरिक्त पाऊस पडण्यामागे कारण काय?

विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या धुवाधार पावसाने पुणेकरांमध्ये अक्षरश: धडकी भरवली होती पुण्यात सोमवारी झालेला मुसळधार पाऊस गेल्या अकरा वर्षांतील दुसरा विक्रमी पाऊस ठरला आहे. आकाशात निर्माण झालेल्या तब्बल अकरा किलोमीटर उंचीच्या प्रचंड ढगांमुळे हा पाऊस पडला असून त्यामुळे शहरातील व्यवस्थेचा बोजवारा उडाला. येत्या काही दिवसात पुण्यात पाऊस कायम राहिल्यास, आत्तापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची […]