अतिसंवेदनशिल पोमकें गर्देवाडा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला महाजनजागरण मेळावा. मा. पोलीस महासंचालक साो. यांच्या हस्ते करण्यात आले पोमकें सुरजागड येथील पोलीस अंमलदार निवासस्थान व पोलीस अंमलदार भोजन कक्षाचे उद्घाटन. उपमुख्यालय, प्राणहिता (अहेरी) येथे सी-60 जवानांचे मनोबल उंचावत मा. पोलीस महासंचालक साो. यांनी जवानांशी साधला संवाद. सी.टी.सी (कमांडो ट्रेनिंग सेंटर) किटाळी येथील प्रशिक्षणार्थी […]
Author: Lokrath Team
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या ‘महा ऐज’ उपक्रमाचा शुभारंभ
मुंबई, दि. १६ : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाने (MPBCDC) मुंबई येथे २० नामवंत संस्थासमवेत महत्वपूर्ण सामंजस्य करार केले आहेत. यामुळे राज्यात कौशल्य प्रशिक्षणातून येणाऱ्या तीन वर्षात २ लाख रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण होणार असून “महा ऐज” (MAHA-EDGE) महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या […]
पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती गठित करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
कोल्हापूर प्रेस क्लबच्या वार्षिक पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण कोल्हापूर, दि.16 (जिमाका) : पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. कोणत्याही प्रश्नाला, समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करतात. पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गी लावण्यात येतील, पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समिती गठित करण्यात येईल, अशी […]
अधिक रोजगार संधी आणि कौशल्य विकासावर भर – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांनी मिळवलेल्या रोजगारांमध्ये अधिकाधिक कौशल्य विकसित करण्यावर विभाग भर देत आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंटच्या जुडियो या ब्रँडसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे आगामी पाच वर्षात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले. मंत्रालय दालन येथे महाराष्ट्र […]
पुरस्कांरांमधून आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळते – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि. 15 : लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर सारख्या पुरस्कारांमुळे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे समाजामध्ये चांगले काम करण्याची प्रेरणा आणखी लोकांना मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गेट वे ऑफ इंडिया येथे लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर […]
वातावरण बदलांमुळे होणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करावे – राज्यपाल रमेश बैस
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. वाढती लोकसंख्या, सातत्याने कमी होत असलेले कृषिक्षेत्र व हवामानातील तीव्र बदल या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठांना आगामी काळातील आव्हानांसाठी तयार राहावे लागेल तसेच वातावरण बदलांमुळे होणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस […]
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी शासन पूर्णपणे मदत करेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यामध्ये पायाभूत सोयी सुविधांची विकास कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. शासन गतिमान निर्णय घेणारे असल्यामुळे बरेच प्रकल्प पूर्ण होत आहेत. विकासासाठी शासनाला महसुलाची आवश्यकता असून महसूल उभारणीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे विभागाच्या सक्षमतेसाठी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणे गरचेजे आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात प्रस्तावित असलेल्या विभागाच्या पहिल्या प्रशिक्षण केंद्रासाठी […]
(UPSC Civil Services Bharti) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024
UPSC Civil Services Bharti 2024. UPSC IAS Bharti 2024. UPSC Civil Service Examination 2024. Union Public Service Commission (UPSC) – Civil Services Preliminary Examination 2024, UPSC Civil Services Recruitment 2024 (UPSC Civil Services Bharti 2024) for 1056 Posts. जाहिरात क्र.: 05/2024-CSP Total: 1056 जागा परीक्षेचे नाव: नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 (Civil Services Preliminary Examination 2024) शैक्षणिक पात्रता: कोणत्याही […]
रिंग रोडची गरज लक्षात घेऊन एमएमआरडीएने सविस्तर प्रकल्प अहवाल बनवावेत -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कल्याण येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण व ई-भूमिपूजन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, कळंबोली, तळोजा, डोंबिवली, कल्याण शहर आणि भिवंडी, ठाणे या शहरांमधील जलद प्रवासासाठी रिंग रोडची आवश्यकता लक्षात घेऊन एमएमआरडीएला डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे आदेश देण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण येथे केले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि स्मार्ट […]