मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार मुंबई, दि. 9 : बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपत आहे. परंतू राज्यात कोविडची आपत्ती त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सदस्य संख्येत केलेली वाढ आणि त्यामुळे झालेली प्रभागांची पुनर्रचना […]
Author: Lokrath Team
पर्यावरणपूरक विचारांची पेरणी करून तापमानवाढ रोखण्याबरोबरच शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करूया – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. 9 – पाणी, शेती, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, आपत्ती, महिला आणि हवामान बदल आदी विविध क्षेत्रांवर वातावरणीय बदलांचे परिणाम दिसून येत आहेत. यावरील उपाययोजनांबाबत पर्यावरणपूरक विचारांची ‘पेरणी’ करून तापमानवाढ रोखण्याबरोबरच शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. डॉ.गोऱ्हे यांच्या पुढाकाराने संपर्क आणि स्त्री आधार केंद्र संस्थांमार्फत आयोजित […]
१२वी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन डाउनलोड करा – Online Download HSC Board Exam Hall Ticket
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/ प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींना सूचित करण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा मार्च – एप्रिल २०२२ साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. १२वी […]
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जनतेला अद्ययावत माहिती मिळणार – मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई, दि. ९ : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नव्याने करण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जनतेला अद्ययावत माहिती मिळेल जनतेने संकेतस्थळाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. मंत्री महोदय यांचे निवासस्थान सिंहगड येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळाचे उद्घाटनप्रसंगी मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन […]
वृद्ध साहित्यिक व कलाकारांनी मानधन योजनेसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; कलाकार मानधन योजना
वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मुंबई शहर व मुंबई उपनगर मधील वृद्ध साहित्यिक व कलावंतांनी मानधन मंजूर करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे. सन 2020-21 व 2021-22 या वर्षाकरीता राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन 1954-55 पासून […]
महिलांच्या सक्षमीकरणासोबतच सुरक्षित वातावरणही महत्त्वाचे – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा
नागपूर, दि. 08 : महिलांचे आरोग्य, सक्षमीकरणासोबतच सुरक्षिततेलाही प्राधान्य असायला हवे. राज्याच्या चौथ्या महिला धोरणाचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध झाला असून सुधारित महिला धोरण कसे असावे, यासंदर्भात नागरिकांनी आपले अभिप्राय कळविणे आवश्यक आहे. यासंदर्भात चर्चा करूनच धोरण ठरविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य सुधारित महिला धोरणाच्या अनुषंगाने विभागीय स्तरावरील […]
‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’ वर विकासकामांची माहिती
नागपूर, दि. 8 : राज्य शासनाने दोन वर्षात केलेली विविध विकासकामे आणि योजनांची माहिती रेल्वेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी पाच विशेष गाड्यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर–गोंदिया ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ वरही आकर्षक पद्धतीने योजनांची माहिती देण्यात आली आहे. या गाडीचे आज दुपारी नागपूर रेल्वेस्थानकावर आगमन झाले. ‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’, ‘दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची’ या घोषवाक्यांसह योजनांची माहिती देण्यासाठी […]
नागपूर विभागातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पशुधन विमा योजना पोहाेचवा – मंत्री सुनील केदार
नागपूर, दि. 7: अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत सर्वाधिक फटका बसतो तो शेतकऱ्यांच्या गुराढोरांना. त्यामुळे शासनाच्या पशुधन विमा योजनेचा लाभ प्रत्येक शेतकरी घेईल यासाठी प्रयत्न करावा. गुरे, शेळी- मेंढीपासून कोंबड्यांपर्यत सर्वांचाच विमा काढता येतो. सहज सुलभ असणारी ही योजना प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात माहिती झाली पाहिजे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रसिध्दी मोहीम राबवावी, असे निर्देश आज राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक […]
राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर
मुंबई, दिनांक 7 : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला. यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्यासह आयोगाचे इतर सदस्य व वरिष्ठ अधिकारी उपस्थित […]
चंद्रपूर महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १२७ जागा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, चंद्रपूर (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या १२७ जागा संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा), इलेक्ट्रिशियन आणि वारयमन पदाच्या जागा अर्ज करण्याची तारीख – दिनांक ८ ते १८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.