ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत – राज्यपाल रमेश बैस यांचे निर्देश

मुंबई, दि. २ : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, नोकरीच्या संधीमध्ये अडचणी येऊ नयेत. यासाठी त्यांच्या भविष्याचा विचार करून सर्व विद्यापीठांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, असे निर्देश राज्यपाल रमेश बैस यांनी दिले. राजभवन येथे राज्यपाल श्री. बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आदिवासी भागातील कुपोषण आणखी कमी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग घ्या; चावडी वाचन, शिबिरे मोठ्या प्रमाणावर घेऊन जनजागृती करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

 आदिवासी भागातील पोषण आहार आणि आरोग्य सेवा सुधारण्यावर राज्य शासनाचे विविध विभाग समन्वयाने काम करीत असल्याने कुपोषणाचे प्रमाण कमी होताना दिसते, मात्र  कृती दलाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करून हे प्रमाण आणखीही कमी झाले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकामी सरपंचांचा सहभाग वाढविण्याची आणि आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर शिबिरे घेण्याचे निर्देश दिले. आदिवासी क्षेत्रातील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

तीन लाख कारागिरांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेला ओळख प्राप्त करून देणारी पी.एम. विश्वकर्मा सन्मान योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केली आहे. महाराष्ट्र या विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतही अग्रेसर राहील, असा विश्वास आहे. या योजनेत जास्तीत जास्त होतकरू तरुणांनी सहभागी व्हावे. या योजनेअंतर्गत २०२८ पर्यंत तीन लाख कारागिरांना विकासाच्या प्रवाहात आणणार असल्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सांगितले. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्र एनसीसी पथकाने सलग तिसऱ्यांदा मिळवलेले यश गौरवास्पद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेचा ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान सलग तिसऱ्यांदा पटकविला आहे. महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाने मिळवलेले हे गौरवास्पद यश त्यांच्या मेहनतीचे आणि सांघिक कामगिरीचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सह्याद्री अतिथीगृहात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दिल्ली येथे संचलनात सहभागी झालेल्या एनसीसी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षणाचा प्रस्ताव तयार करावा – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी भागातील शेतकरी, युवक आणि महिलांना रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ तयार करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले. मंत्रालयात मंत्री डॉ.गावित यांच्या अध्यक्षतेखाली आज आदिवासी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

‘व्हाय वेस्ट वायईडब्ल्यूएस’ॲप व डॅशबोर्डचे चे उद्घाटन

मुंबई, दि. ३१ : राज्यातील दुष्काळाचा इतिहास पाहता पाण्याची बचत करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. चांगल्या पर्यावरणासाठी “व्हाय वेस्ट वायईडब्ल्यूएस”(Why Waste YEWS) ऍप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त आणि टँकरमुक्त करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. जलसंधारणाला प्रोत्साहन देण्यासाठी “व्हाय वेस्ट वायईडब्ल्यूएस”(Why Waste […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे थाटात उद्घाटन

– आयुष्य गतिमान करायचे असेल तर वेळेनुरूप स्वतः त बदल घडविणे काळजी गरज.—– श्री. चेतन पाटील, तहसीलदार, मुलचेरा  मुलचेरा: तालुक्यातील गणेशनगर येथे आयोजित केलेल्या स्थानिक नेताजी सभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे अत्यंत थाटात उद्घाटन पार पडले. गणेशनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परीसरात आयोजित केलेल्या या शिबिरात ग्रामस्थ व विद्यार्थांचा उत्स्फूर्त […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

विदर्भातील आठ जिल्ह्यांत ‘कौशल्य रथ’द्वारे व्यवसाय प्रशिक्षण देणार

स्थानिक नवोदित युवकांमधील कौशल्य विकास वाढवणे, प्रत्येकाच्या हाताला रोजगार देणे, कौशल्य विषयक अभ्यासक्रमांच्या बाबत जनजागृती तसेच रोजगारक्षम युवक-युवतींची नोंदणी व्हावी यासाठी विदर्भातील आठ जिल्ह्यांत ‘कौशल्य रथ’च्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि पुष्पांचल फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘कौशल्य रथ’चे उद्घाटन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

अभिनेते अशोक सराफ त्यांनी अनेक मराठी चित्रपट तसेच थिएटरमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे.  गेली पन्नासहून अधिक वर्षे ते या इंडस्ट्रीशी जोडले गेलेले आहेत.  ‘महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. या पुरस्काराबाबत मला अतिशय आनंद […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

उद्यापासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. 9 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने 31 जानेवारीला या अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे. मुर्मू यांचे अभिभाषण यावेळी संसदेच्या केंद्रीय कक्षात न होता नवीन संसद भवनातील लोकसभेच्या सभागृहात होणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रपती मुर्मू यांचे यावेळी प्रथमच नवीन संसद भवनात आगमन होणार […]