महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या अंकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मंत्रालयात बैठकीत हा प्रकाशन समारंभ झाला. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव […]
Author: Lokrath Team
मिरची उत्पादन आणि कलेक्टर आंब्याच्या भौगोलिक मानांकनासाठी प्रयत्न सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना श्रीमती प्रीती हिरळकर यांचे मार्गदर्शन
गडचिरोली दि, 21 एप्रिल : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा जिल्हा तंत्रज्ञान व व्यवस्थापन संस्था (आत्मा), सोनापूर-गडचिरोलीच्या प्रमुख प्रीती हिरळकर यांनी आज सिरोंचा तालुक्यातील अंकिसा परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना आणि प्रगतशील शेतकरी विश्वेश्वरय्या कोंड्रा यांच्या कलेक्टर प्रजातीच्या आंबा फळबागेस भेट देऊन शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या भेटी दरम्यान मिरची उत्पादनातील अडचणी, हवामान बदलाचे परिणाम, शेतकरी […]
मंत्रालयात ५ ते ९ मे दरम्यान “टेक वारी – महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” विशेष प्रशिक्षण कार्यक्रम- अपर मुख्य सचिव व्ही राधा
नागरी सेवा दिनाचे २१ एप्रिल औचित्य साधून महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करणे तसेच मुख्यमंत्री महोदयांना १०० दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या iGOT प्रणालीवर तीन महिन्यात ९ हजारावरून ५ लाख कर्मचा-यांची नोंदणी करण्यात आलेल्या सर्वांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे. यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे “महाराष्ट्र टेक लर्निंग वीक – टेक वारी” हा विशेष […]
जनतेच्या अर्जांवरील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले सादरीकरण विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज व निवेदनांवर सकारात्मक कार्यवाही होवून या अर्जाची सद्यस्थिती अर्जदाराला एसएमएसद्वारे कळण्यासाठी पब्लिक ग्रिव्हेन्सेस रिडर्रसल सिस्टिम (पीजीआरएस) ही ऑनलाईन प्रणाली लवकरच कार्यान्वित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुख्यमंत्री सचिवालयात या संदर्भात बैठक झाली. शासकीय कामकाजामध्ये […]
समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पाश्चिमात्य संकृती ही ज्याच्याकडे शक्ती आहे तो जगेल असे म्हणते. भारतीय संस्कृती मात्र, जो जन्माला आला आहे तो जगेल आणि समाज त्याला जगवेल असे सांगते. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र, पुणे आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी आयोजित दिव्यांगांना […]
कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या वापराने जनसंपर्क क्षेत्रातील कामे प्रभावीपणे करावीत- प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह
आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात कृत्रिम बुद्धिमत्ता हे व्यवस्थापन व संवाद क्षेत्रात एक प्रभावी साधन ठरत आहे. जनसंपर्क क्षेत्र हे विश्वासावर चालते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि चॅटजीपीटी (ChatGPT) आदीसारख्या तंत्रज्ञानांनी मोठा बदल घडवून आणला आहे. एआय, चॅटजीपीटी, कॅनव्हा आदी सगळी साधने आहेत, याचा वापर योग्यरित्या करायला शिका. या साधनांचा उपयोग करून जनसंपर्क क्षेत्रातील कामे अधिक चांगली आणि प्रभावीपणे करावीत, असे प्रतिपादन माहिती व […]
क्रीडासह अनेक क्षेत्रात महाराष्ट्राकडून देशाचे नेतृत्व – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
पुरस्कार विजेत्यांनी राज्यातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे राज्यपालांच्या हस्ते वितरण; शंकुतला खटावकर, प्रदीप गंधे यांना जीवनगौरव पुरस्कार पुणे, दि. १८: महाराष्ट्राने उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा तसेच क्रीडा क्षेत्रातही देशाचे नेतृत्व केले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी मुलांना […]
बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
बनावट पनीर किंवा चीज अॅनालॉग वापरणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे. पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे. मंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले, पनीर हा खाद्यपदार्थामधील आवडता पदार्थ असून त्याला बाजारात मोठी […]
बालकांच्या अनधिकृत संस्थांवर कठोर कारवाई होणार – आयुक्त नयना गुंडे यांची माहिती
राज्यातील काही भागांमध्ये बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बालगृह, वसतिगृह आणि अनाथाश्रमांविरोधात महिला व बालविकास विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. अशा अनधिकृत संस्थांवर एक वर्ष कारावास अथवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षांची कारवाई केली जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी दिली आहे. अनधिकृतपणे संस्थांमध्ये बालकांना डांबून ठेवणे, त्यांच्यावर शारीरिक, मानसिक आणि […]
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दर्जेदार आरोग्यसेवा दुर्गम भागांपर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आरोग्यसेवेच्या सुविधांसाठी महाराष्ट्र एक महत्त्वपूर्ण केंद्र बनले आहे. राज्यात सर्व प्रकारच्या दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. ही गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी डॉक्टरांची, तज्ञांची मदत आवश्यक असून आजच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]