ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गोंडवाना विद्यापीठाच्या लोकपालपदी अविनाश राजकारणे

गोंडवाना विद्यापीठाच्या लोकपालपदी नागपूर येथील सेवानिवृत्त अतिरिक्त सत्र न्यायाधीश अविनाश मधुकर राजकारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसूचनेनुसार लोकपाल पदावर 6 फेब्रुवारी 2024 पासून अंशकालीन तत्वावर तीन वर्षाकरीता किंवा त्यांच्या वयाच्या 70 वर्ष पूर्ण होईल तोपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकपाल पदी नियुक्ती झाल्याबद्दल अविनाश राजकारणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर तातडीने निर्णय होणार
 
विद्यापीठाशी संलग्नित चंद्रपुर, गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांतील महाविद्यालये व विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाच्या किंवा विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाच्या निर्णयाविरुद्धच्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता व निर्णय देण्याकरीता गोंडवाना विद्यापीठाच्या लोकपाल पदी अविनाश राजकारणे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे विद्यापीठाने कळविले आहे.