ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

आयुष्मान कार्ड काढा ऑनलाईन, मिळणार 5 लाखापर्यंत मोफत उपचार

आयुष्मान कार्ड काढा ऑनलाईन, मिळणार 5 लाखापर्यंत मोफत 1201 आजारांवर मोफत उपचार; ‘आयुष्यमान’चे ई-कार्ड काढले का? जनजागृतीचा अभाव; नागरिकांपर्यंत पोहोचेनात आरोग्य योजना.

आयुष्मान भारत योजना कार्ड योजना

आयुष्यमान भारत योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना असून, या योजनेंतर्गत 1 हजार 201 आजारांवर तसेच 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. लाभ घेण्याकरिता मात्र ई कार्ड असणे गरजेचे आहे; परंतु जनजागृतीअभावी ई कार्ड काढणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.

केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना या तिन्ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत 2018 मध्ये या योजना सुरू केल्या आहेत.

स्थानिक आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णांना या योजनेंतर्गत लाभ देण्यात येत असून, जिल्ह्यातील हजारो गोरगरीब रुग्णांना उपचार सोयीचे झाले आहेत.

लाभ काय?

आयुष्यमान योजनेंतर्गत 1 हजार 201 आजारांवर मोफत उपचार केले जातात. 5 लाख रुपयांपर्यंत या योजनेतून उपचार होतात. याची जनजागृती मात्र होत नसल्याचे चित्र आहे.

मोफत उपचार, शस्त्रक्रिया

कोणत्याही आजारावर उपचार, उम्म्म शस्त्रक्रिया अगदी मोफतपणे करण्यात येते. त्यासाठी विशिष्ट रुग्णालयांची निवडही करण्यात आलेली आहे.

आयुष्यमान भारत योजना आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असून, या योजनेंतर्गत 5 लाखांपर्यंत मोफत उपचार केला जातो. हिंगोली जिल्ह्यातही या योजनेंतर्गत उपचार करण्यात येत असून, याचा गोरगरीब, सामान्यरुग्णांना फायदा होत आहे