गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे सिरोंच्या तालुक्यातील तुमनूर माल येथे बजरंग दल पेंटीपाका भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित..!

माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून विजेत्या संघाला प्रथम 21000/- व द्वितीय 11000/-रुपये पारितोषिक..!!

माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे सिरोंच्या तालुक्यातील तुमनूर माल येथे बजरंग दल पेंटीपाका भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,त्या स्पर्धेत मोठ्या संख्येने गडचिरोली जिल्ह्यातील कबड्डी संघ सहभागी झाले होते, युवा कबड्डी स्पर्धकांचा जोश व उत्साह यावेळी कबड्डी स्पर्धे दरम्यान पाहायला मिळाला.

माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे क्रीडा स्पर्धेला  प्रोत्साहन देत असताना आणि आपल्या क्षेत्रातील युवकांना क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन आपलं भविष्य क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून घडवावे आणि आपल्या क्षेत्राचं नावलौकिक करावे यासाठी ते नेहमी युवकांना प्रेरीत करत असतात, दरवर्षी अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यातील क्रीडा स्पर्धेसाठी पारितोषिके देत असतात.

यावेळी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून प्रथम क्रमांक विजेत्या, उडान संघाला शिल्ड व *21000* /-(एकवीस हजार रुपये) पारितोषिक देण्यात आले,तर द्वितीय क्रमांक विजेत्या, एस.आर. नगरम संघाला शिल्ड व *11000* /-(अकरा हजार रुपये) पारितोषिक सिरोंच्या तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी सिरोंच्या तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्री.शंकर नरहरी, सतीश सतोषपू, जीडी सत्यम, संपत दया, चंद्रशेखर चेतकरी, रवींद्र आलकरी, राम सीरंगी, शाहरुख पठाण, नागराजू गौरपु, आदर्श सीरंगी,आदर्श हे उपस्थित होते..!