गडचिरोली: मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परीवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील समुदाय आधारीत संस्थांकडून मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज हे शेतमाल, शेळया (मांस व दुग्ध) आणि परसबागेतील कुकुटपालन (अंडी) यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उप्रप्रकल्पांसाठी आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारीत संस्थामध्य शेतकरी उत्पादक कंपनी,आणि त्यांचे फेडरेशनस, महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापित प्रभाग संघ,महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचालित साधन केंद्र,यांचा समावेश आहे.
संदर्भातील माहिती, अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष,अर्जाचा नमुना इ,माहिती https://www.smart-mh.org या संकेतस्थळावर Call For proposal या टॅबवर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन डाउनलोड करुन प्रिंट घ्यावी. त्यामध्ये माहिती भरुन व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्रकल्प संचालक,आत्मा,गडचिरोली कार्यालयात तसेच लोकसंचालित साधन केद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी,माविम,गडचिरोली आणि प्रभाग संघांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक,एमएसआरएलएम,गडचिरोली यांचे कार्यालयात ऑफलाईल दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत सादर करावेत. या अगोदर ऑनलाईन अर्ज केलेल्या संस्थांनी पुनश्च: अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
तरी गडचिरोली जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपनी, प्रभाग संघ आणि लोकसंचालित साधन केंद्र, यांनी अर्ज सादर करावयाचे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा, गडचिरोली यांनी केली आहे.