ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

बाळासाहेबाची शिवसेना मुलचेरा प्रमुख गौरव बाला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुलचेरा तालुक्यातील क्रिडा संकुल खेळाडु साठी सुरू करावी अशी मागणी केले

तालुक्यातील खेळाडूचे सुप्त गुण पुढे येण्यासाठी गौरव बाला यांच्या हस्ते विविध खेळाचे उदघाटन

मुलचेरा:-
तालुक्यात हिवाळी कालावधीत दर वर्षी खेळ होत असतात. खेळाच्या माध्यमातून खेळाडूचे सुप्त गुण समोर येत असतो.त्याचे गुण समोर आल्याने तालुक्यातून जिल्ह्यात,जिल्ह्यातून राज्यात, राज्यातून भारतात अश्या पद्धतीने खेळाडू उंछ भरारी घेऊन आपल्या गावातील नाव लौकिक करतात.
गत दोन वर्षात सर्व खेळ ठप्प झाले होते. तसेच कोरोनामुळे अनेक प्रकारचे निर्बंध होते.आता अनेक खेळाचे आयोजन नागरिक मनमोकळेपणाने करीत आहेत.
या 2022 वर्षी खेळाडूला खेळण्याची संधी मिळवुन देऊन त्याला एक उत्तम स्टेज मिळावा.या करिता बाळासाहेबाची शिवसेना मुलचेरा प्रमुख गौरव बाला यांनी पुढाकार घेतले आहे.

बाळासाहेबाची शिवसेना मुलचेरा प्रमुख गौरव बाला यांच्या पुढाकाराने फुटबॉल,क्रिकेट,कबड्डी अश्या विविध प्रकारचे खेळ तालुक्यातील विवेकानंदपूर, देवनगर,गणेशनगर, उदयनगर, देशबंधुग्राम विश्वनाथनगर येथे उदघाटन यांच्या हस्ते करण्यात येत आहे.उदघाटन प्रसंगी यांच्या भेटीला मोठ्या प्रमाणात गावातील खेळाडू व नागरिकांची गर्दी होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भामरागड तालुक्यातील 25 ऑक्टोबर रोजी धोडराज येथे दोऱ्यावर आले असता गौरव बाला यांनी आपल्या चमू सोबत अतिसंवेदनशील धोडराज या परिसरात जाऊन मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली मुलचेरा तालुक्यातील रस्ते, पाणी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा आदी मूलभूत सुविधांची अधिक सक्षम करावी याची मागणी केली तसेच तालुक्यात असलेला क्रिडा संकुल तालुक्यातील खेळाडूसाठी संकुल, मैदान खुले करावे क्रिडा संकुल खुले झाले तर खेळाडू सर्वोपरीने मैदानात श्रम करून अधिक सक्षम बनतो याची मागणी केली आहे.

तालुक्यात खूप खेळाडू आहे पण त्यांना पुढे जाण्याची संधी मिळत नाही.या माध्यमाने त्यांचे गुण दिसणार हा माझा छोटासा प्रयत्न आहे

गौरव बाला
बाळासाहेबाची शिवसेना प्रमुख मुलचेरा