ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुलचेरात वार्षिक शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते संपन्न

स्थानिक राजे धर्मराव हायस्कूल मूलचेरा येथे सरस्वती पूजे निमित्ताने वार्षिक शालेय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा तसेच धर्मराव शिक्षण मंडळ अहेरीचे अध्यक्ष राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते, त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात म्हटल की आपला आजचा युवा हा उद्याचा देशाचा भविष्य आहे, क्रीडा असो वा शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी जीवनापासून जर आपल्या युवा पिढीने परिश्रम घेतले तर तो भविष्यात आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं,आपल्या राज्याचं आणि मग आपल्या देशाच सुद्धा नाव रोषन करू शकतो, त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले, कै. राजे विश्वेशराव महाराज यांनी एका रोपट्या पासून सुरू केलेला धर्मराव शिक्षण मंडळ आज एक वटवृक्ष बनलेला आहे आणि त्यांनी आपल्या क्षेत्रातील प्रत्येक युवा शिक्षित झाला पाहिजे या उद्देशाने धर्मराव शिक्षण मंडळ शेवटच्या टोका पर्यंत पोहचविण्याचं काम केलं असे मत त्यांनी या वेळी दिले, पुढे बोलताना ते म्हणाले आपण आपल्या क्षेत्रातील युवा वर्गाला प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी सहकार्य करत असतो युवा पिढीने आपली प्रगती करावी आणि प्रत्येक क्षेत्रात करिअर करावं असे मत त्यांनी यावेळी दिले, तसेच राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणीत केला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजकुमार अवधेशबाबा आत्राम कोषाध्यक्ष धर्मराव शिक्षण मंडळ अहेरी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुलचेरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी अशोक भापकर, तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता, उपसरपंच तपन मल्लीक,ग्रा. सदस्य.बादल शाह,माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती, उत्तम शर्मा,नगरसेवक दिलीप आत्राम,नगरसेवक विकास उईके, अहेरीचे तालुका अध्यक्ष रवीभाऊ नेलकुंद्री,सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ उरेते,माजी मुख्याध्यापक बच्छाड सर, जेष्ठ नागरिक बिधान बैद्य,गणेश गारघाटे,विजय बिश्वास, उमेश सरकार,गणेश बँकावार,किशोर मल्लिक आदी मान्यवर व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी गण,राजे धर्मराव हायस्कूलचे शिक्षक वर्ग उपस्थित होते.