ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत बिटिंग द रिट्रीट समारोह संपन्न

मुंबई, दि. 5 : भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे नौदल दिनानिमित्त रविवारी (दि.4) गेट वे ऑफ इंडिया येथे ‘बिटींग द रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’चे आयोजन करण्यात आले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अजेंन्द्र बहादूर सिंह, श्रीमती  चारू सिंह, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, माजी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.

यावेळी नौदलातर्फे हेलिकॉप्टर्सचे फ्लाय पास्ट, नेव्ही बँड, शब्द न उच्चारता  सातत्यपूर्ण कवायत आणि सी कॅडेट कोअरच्या लहान मुलींतर्फे ‘हॉर्नपाइप सेलर्स डान्स’ सादर करण्यात आले. मुलींच्या कवायत नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. नौदल दिनानिमित्त  समुद्रातील जहाजांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

कार्यक्रमानंतर नेव्ही हाऊस येथे नौदलाचे मुख्य ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल राजेंद्र बहादूर सिंह यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारोहाला उपस्थित राहून राज्यपाल कोश्यारी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

सन १९७१ च्या भारत – पाक युद्धादरम्यान चार डिसेंबर रोजी कराची बंदरावर झालेल्या निर्णायक हल्ल्यातील शौर्याच्या स्मृतीनिमित्त तसेच नौदलाच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी चार डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो.

०००००

Governor Koshyari attends Beating Retreat The Ceremony on Navy Day

Mumbai, 5th Dec : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari attended the ‘Beating Retreat’ and Tattoo Ceremony organised by the Western Naval Command of Indian Navy at Gateway of India in Mumbai on the occasion of Navy Day on Sunday (4 Dec).

Vice Admiral Ajendra Bahadur Singh, Flag Officer Commanding in Chief, Western Naval Command, Smt Charu Singh, serving and retired officers of Indian Navy and invitees from various walks of life were present.

The event included breath-taking performances by the naval band, a short operational demonstration, the Beating Retreat Ceremony, a fly-past by naval helicopters, continuity drill by naval personnel and the Sailor’s Dance by children of the Sea Cadet Corps. The delightful Dance by the young cadets of the Sea Cadet Corps received thunderous applause from the audience.

Later in the evening, the Governor attended the At Home reception hosted by the Flag Officer Commanding in Chief at the Navy House.

Navy Day is observed on 4th December every year to commemorate the Navy’s stunning attack on Karachi that contributed crucially to India’s victory in the Indo-Pak war of 1971.