सिरोंचा:-तालुक्यातील पोचमपल्ली (कोटा) येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत त्यांचे स्वागत केले.
कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम,माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम तसेच युवा नेते ऋतुराज हलगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सिरोंचा तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकतेच प्रवेश केला आहे.यात गर्कापेठा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पोचमपल्ली (कोटा) येथील दशरथ रेड्डी बोम्मावार,शंकर बोले,नरेश दुर्गम,पेदामरण्णा मादरबोईना,संतोष मादरबोईना,श्रीनिवास गौरारपू,मलेश येया, मोहन डोंगरे,समय्या मारबोईना, मोंडी तलांडे,श्रीनिवास कोरके,नवीन गौरारपु आणि रघुपती तलांडी यांचा समावेश आहे.