ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय सप्ताहाचा प्रारंभ

गडचिरोली अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व वंचित दुर्बल व्यक्तींच्या सर्वागीण घटकातील करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांनी माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, या उददेशाने दरवर्षी 8 एप्रिल 14 एप्रिल कालावधीत राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने 8 ते 14 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली याच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती शाहु महाराज, महात्मा ज्योतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन झाले. यावेळी डॉ.देवसुदन धारगावे, उपायुक्त जिल्हा जात प्रमाण पडताळणी समिती गडचिरोली याच्या हस्ते भारतीय संविधानाचा उदेशिकाचे प्रतिहृती आनावरण करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करुन जनजागृती करण्यात आले. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.