पीएम मोदींनी शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. एकाच दिवसात देशातील तीन सेलिब्रेटींना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, नरसिंह राव आणि हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली आहे.देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे, असे मोदींनी ट्विटरवरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असो किंवा देशाचे गृहमंत्री असो आणि आमदार असतानाही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच चालना दिली, असेही त्यांनी लिहिले आहे. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे.
Related Articles
उद्योगांनी आता कौशल्य प्रशिक्षणासाठी पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
१ लाख २१ हजार युवक, युवतींना उद्योग, कॉर्पोरेट संस्थांमध्ये रोजगारासाठी सामंजस्य करार मुंबई, दि. 16 : राज्यातील युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आज राज्यातील ४४ नामांकित उद्योजक, कॉर्पोरेट संस्था, औद्योगिक संघटना, प्लेसमेंट एजन्सिज यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आले. या करारामार्फत राज्यातील 1 लाख 21 हजार युवक, युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यपाल भगत सिंह […]
गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई
नक्सल्यानी पुरुन ठेवलेले स्फोटक साहीत्य हस्तगत करण्यात आले नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरुन ठेवतात. अशा पुरुन ठेवलेल्या साहित्यांच्या वापर नक्षलवाद्यांकडुन नक्षल सप्ताह तसेच इतरप्रसंगी केला जातो. दिनांक 11/10/2022 रोजी दुपारी 12.00 वा. […]
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करणेबाबत…रविवार दिनांक 17 सप्टेंबर, 202३. GR
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करणेबाबत…रविवार दिनांक 17 सप्टेंबर, 202३. GR https://bit.ly/3LIv851