नवनियुक्त भारतीय जनता पक्ष मूलचेरा तालुका अध्यक्ष संजीव सरकार यांचा पुढाकाराने मूलचेरा येथील स्थानिक नेताजी सुभाषचंद्र चौक पासून,आष्टी रोड, आलापल्ली रोड आणि तसेच तहसील कार्यालय मूलचेरा समोर,भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर ‘सेवा पंधरवाडा’ निमित्ताने “स्वच्छता ही सेवा” या उपक्रमा अंतर्गत भारतीय जनता पक्ष तालुका मूलचेरा कडून ,कुडा,कचरा, प्लास्टिक, घाण, साफ-सफाई करण्यात आली आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.या माध्यमातून ‘स्वच्छता ही सेवा’ हा संदेश जनतेला देण्यात आला.
त्यावेळी नवनियुक्त भारतीय जनता पक्ष मूलचेरा तालुका अध्यक्ष संजीव सरकार, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता, तालुका उपाध्यक्ष विजय बिश्वास,माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती, उपसरपंच तपन मल्लिक,नगरसेवक दिलीप आत्राम,गणेश गारघाटे,महिला आघाडी तालुका अध्यक्ष प्रभाती भक्त, तालुका उपाध्यक्ष अनिता सरकार, पदाधिकारी आणि मूलचेरा तालुक्यातील कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते..!