ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कोरेपल्ली येथे भुमकल दिवस साजरा

दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी, अहेरी तालुक्यातील मौजा – कोरेपल्ली येथे भुमकल दिनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी गाव भुमिया श्री दामा गावडे यांच्या हस्ते भुमकल आंदोलनाचे महानायक गुंडाधुर दुर्वे यांच्या फोटोला पुजा करुन भुमकल दिनाच्या कार्यक्रम सुरू करण्याट आले.
तसेच येरमनारचे माजी सरपंच श्री बालाजी गावडे यांनी उपस्थीत गावकऱ्यांना भुमकल आंदोलन आणि गुंडाधुर दुर्वे यांच्या इतिहासाबदल माहिती देण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता बाबुराव तलांडी, कोरेपल्ली गावाचे इरपा गावडे, संभा गावडे, मासा आत्राम, मादी कुळमेथे, बोड्डा कुळमेथे, सौ. बेबी गावडे, सौ. पांडे गावडे, सौ. बंडे गावडे, सौ. सोनी गावडे, कवटाराम चे सौ. गिल्लो आत्राम सह कोरेपल्ली गावातील नागरिक उपस्थित होते.