▪️राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ‘एक घर, एक रेशनिंग कार्ड’ योजनेअंतर्गत डुप्लिकेट शिधापत्रिका रद्द करण्याची कारवाई केली जात आहे. राज्यात मे महिना अखेर 2 लाख 32 हजार 766 रेशन कार्ड डुप्लिकेट आढळली आहेत. छाननीनंतर यातील 1 लाख 27 हजार रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक 24 हजार 821 रेशनिंग कार्ड ही नागपूरमध्ये तर सर्वात कमी परभणी जिल्ह्यात 38 इतकी आढळून आली.
