राज्यातील पोलीस भरतीच्या उमेदवारांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली आणि त्यांनी पोलीस भरती अर्जाची मुदत १५ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून पोलिस भरतीसाठी अर्जाची मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे. 15 डिसेंबर 2022 पर्यंत उमेदवार पोलीस पदांसाठी अर्ज करू शकतात.
अर्जाची सुरू होण्याची तारीख | 03/11/2022 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15/12/2022 |
एकूण जागा | 14,956 |
नौकरीचे ठिकाण | महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
