देशातील अनेक लहान उद्याेगांसाठी भविष्य निर्वाह निधी (पीएफ), निवृत्ती वेतन, विमा अशा सामाजिक सुरक्षा योजनांच्या योगदानांचे विलीनीकरण लवकरच होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकार हा निर्णय येत्या काही दिवसांत घेण्याच्या तयारीत असल्याची माहीती आहे.
केंद्र सरकारने जर हा निर्णय घेतला तर प्रामुख्याने दरवेळी मिळणारे अनेक योजनेचे लाभ नागरिकांना एकाच वेळी मिळू शकतात. संस्थांना वेगवेगळे योगदान अनेक वेळा जमा करण्याची गरज राहणार नाही. तर सर्वांची मिळून एकच रक्कम जमा केल्याने सोपी गोष्ट होणार आहे.
सूत्रांच्या माहीतीनुसार, केंद्र सरकार हा निर्णय घेण्यासाठी देशातील यासंबंधित काही तज्ज्ञ लोकांची समिती बनवणार आहे. विलीनीकरण झाल्यानंतरही समजा एखाद्या योजनेचा योगदानाचा दर 10 ते 12 टक्के असला तर तो तसाच राहू शकेल, यामुळे नागरिकांना कुठेही नुकसान होण्याची शक्यता नसणार आहे. तर एकाच वेळेस नागरिकांना या योजनांचा लाभ मिळू शकतो.
लहान कंपन्यांसाठी सरकारची काय योजना?
आता केंद्र सरकार काही आर्थिक घडी विस्कटलेल्या कंपन्याना मदत करणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता केंद्र सरकार मागील काही काळात आर्थिक नुकसानाची झळ बसलेल्या छोट्या कंपन्यांसाठी सार्वत्रिक सुरक्षा योजना आणण्याचा विचार करत आहे. याशिवाय अशा कंपन्यांना सामाजिक सुरक्षा योजनांतील योगदान देण्यासाठीही नव्या योजनेमुळे दिलासा मिळू शकतो.