ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आता रस्तावरील विक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेद्वारे मिळणार कर्ज

केंद्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. अशातच केंद्र सरकारने रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या लोकांना कर्ज मिळावे यासाठी पीएम स्वनिधी योजना राबवत आहे. 

पहा कशी आहे हि योजना

या योजनेअंतर्गत तुम्ही सर्वात आधी 10,000 रुपयांचे कर्ज घेऊ शकता. हे कर्ज 12 महिन्यांच्या कालावधीत भरण्याची मुदत असते. 

 या कालावधीत तुम्ही कर्ज भरल्यास दुसऱ्यांदा तुम्हाला 20,000 तर तिसऱ्यांदा 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. 

 तसेच या योजनेत अटी व नियंमाचे पालन केल्यास कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नाही. या योजनेअंतर्गत तुम्ही वेळेवर कर्ज भरल्यास तुम्हाला 7 टक्के अनुदान देखील मिळते.